Bhosari : घरात ठेवलेल्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

एमपीसी न्यूज – घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) पहाटे शास्त्रीचौक भोसरी येथे घडली.

माणिकदामू रेटवडे (वय 55, रा. शास्त्रीचौक, आळंदी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेटवडे नोकरी करतात. ते शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास नोकरीसाठी बाहेर गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉक उचकटून त्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 45 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. रेटवडे दुपारी दोनच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काठोरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.