Bhosari Crime News : कंपनीत कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या दहा जणांच्या टोळक्याकडून तिघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी येथील पूना पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कॉन्ट्रॅक्टवर काम करणा-या दहा जणांच्या टोळक्याने कंपनीतील तीन जणांना किरकोळ वादातून बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.8) पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान घडली.

राजेंद्र निवृत्ती बोरसे (वय 50, रा. चिखली प्राधिकरण), शिवम राजपूत, यशपाल राजपूत अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत बोरसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार मनीष राम क्षीरसागर (वय 20, रा. पिंपळे सौदागर), अजय संगीतराव वाघमारे (वय 18, रा. पिंपरी), तेजस सुडके आणि अन्य सहा ते सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या कंपनीत गणेश एंटरपायजेस नावाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात. आरोपींनी किरकोळ वादातून फिर्यादी आणि त्यांच्या कंपनीत काम करणा-या शिवम व यशपाल या दोन कामगारांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली.

यात फिर्यादी यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला. डोक्याला जखम होऊन दोन टाके पडले, तर शुभमच्या डोक्यात पाईप मारल्याने तो देखील गंभीर जखमी झाला.

शुभमच्या डोक्यात आठ टाके पडले, यशपाल याला देखील मारहाण करुन आरोपींनी जखमी केले आहे. आरोपींनी कंपनीतील इतर कामगारांना शिवीगाळ करून खून करण्याची धमकी देत कंपनीत नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.