Bhosari Crime News : भोसरीत सव्वादोन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – विवाह समारंभानिमित्त ग्वाल्हेर येथे गेलेल्या कुटुंबीयांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. यात दोन लाख 18 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 27) सकाळी आपटे कॉलनी, भोसरी येथे उघडकीस आली.

समर सारंग कामतेकर (वय 29, रा. भाग्यदर्शन सोसायटी, आपटे कॉलनी, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामतेकर त्यांच्या कुटुंबीयांसोबत विवाह समारंभासाठी 23 एप्रिल रोजी ग्वाल्हेर येथे गेले होते. ते 27 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास विवाह समारंभावरून परत घरी आले.

दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून चांदीचे मनगटी घड्याळ, लॅपटॉप आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.