Bhosari crime News: मेफेड्रोन ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – मेफेड्रोन ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 39 हजार 600 रुपये किमतीचे 13.20 ग्राम मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 16) सायंकाळी साडेसात वाजता शाहूनगर, चिंचवड येथे करण्यात आली.

शुभम सुभाष घटक (वय 23, रा. काळेवाडी), हर्शल उर्फ बंटी किशोर पाटील (वय 28, रा. आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस शिपाई प्रसंग जंगीलवाड यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूनगर चिंचवड येथील केएसबी चौकात दोघेजण ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी केएसबी चौकात सापळा रचून आरोपी शुभम आणि हर्शल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मेफेड्रोन ड्रग्ज मिळाले.

पोलिसांनी 39 हजार 600 रुपये किमतीचे 13.20 ग्राम मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करून दोघांना अटक केली.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.