Bhosari Crime News: वारंवार तडीपार आदेशाचा भंग करणाऱ्या दोन गुन्हेगारांची येरवडा कारागृहात रवानगी

एमपीसी न्यूज – तडीपार आदेशाचे उल्लंघन करून दोन आरोपी शहरात वावरताना मिळून आले. त्यांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले. हे आरोपी वारंवार तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याने न्यायालयाने त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

कृष्णा ऊर्फ दाद्या गणेश भोसले (वय 21, रा. बालाजीनगर, भोसरी), नीलेश सुनील पवार (वय 24, रा. मोशी) अशी आरोपींची नावे आहेत.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना तडीपार केले आहे. मात्र तडीपार आदेशाचा भंग करून आरोपी शहरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (दि. 2) दोन्ही आरोपींना बालाजीनगर झोपडपटटी, भोसरी येथून ताब्यात घेतले.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. वारंवार तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याने न्यायालयाने त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी केली.

ही कारवाई एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सतीश नांदुरकर, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, पोलीस कर्मचारी संजय भोर, नवनाथ पोटे, विजय दौंडकर, करन विश्वासे, अनिल जोशी, रहिम शेख, विशाल काळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.