Bhosari Crime News : एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जय गणेश साम्राज्य चौकातील घटना

0

एमपीसी – एसटी बसने पाठिमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. जय गणेश साम्राज्य चौक, मोशी याठिकाणी गुरूवारी (दि.7) सकाळी नऊ वाजता ही घटना घडली.

किरण हनुमंत अमराळे (वय 24, रा. साई कॉलनी, एकतानगर, चाकण) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याप्रकरणी चंद्रकांत नानाभाऊ अमराळे (वय 43, रा जाधववाडी, चिखली, मुळगाव दावडी, खेड) यांनी भोसरी एमआयडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एसटी चालक रमेश गोपीनाथ डमाळे (वय 47, रा. साई खिंड, चिकणी, अहमदनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत किरण गुरूवारी सकाळी नऊच्या सुमारास आपल्या (एमएच 14 जीझेड 3503) या दुचाकीवरून पुणे नाशिक हायवेवरून बाणेरकडे जात होता. त्यावेळी (एमएच 06 एस 8468) या एसटी बसने त्याच्या दुचाकीला पाठिमागून धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या किरण अमराळे याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी अधिक तपास भोसरी एमआयडीसीचे पोलीस उपनिरिक्षक आर. बी. जाधव करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.