Bhosari crime News : खेळताना पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – खेळताना पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना भोसरी येथे शुक्रवारी (दि. 13) दुपारी घडली.

विराज सुनील मोरे (वय 2, रा. सत्यनारायण हाऊसिंग सोसायटी, दिघी रोड, भोसरी) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराज यांच्या घराच्या मागील बाजूस ज्ञानेश्‍वर गवळी यांचा जनावरांचा गोठा आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी त्यांनी जमिनीलगत हौद बांधला आहे. विराज दुपारी खेळताना पाण्याच्या हौदाजवळ गेला आणि खेळता खेळता हौदात पडला.

घटना घडल्यानंतर अर्ध्या तासाने विराजच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. बराच वेळ शोधल्यानंतर विराज पाण्याच्या हौदात पडल्याचे आढळले. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.