23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Bhosari Crime News : महिलेला शिवीगाळ, मुलाला जीवे मारण्याची धमकी देत घरातील साहित्याची तोडफोड

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरातील टीव्ही आणि इतर साहित्याचे नुकसान केले. याबाबत एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री बालाजीनगर, भोसरी येथे घडली.

सचिन धहिरे (रा. बालाजीनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत उषा गौतम कसबे (वय 40, रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीने आरोपीच्या भावासोबत प्रेमविवाह केला आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपी हा फिर्यादी यांच्या घरी आला. ‘माझा भाऊ कुठे आहे’, असे आरोपीने फिर्यादी यांना विचारले. त्यावर फिर्यादी यांनी ‘मला माहीत नाही’, असे सांगितले.

याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचा मुलगा अमर याला जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्या घरातील टीव्ही आणि इतर साहित्याचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

spot_img
Latest news
Related news