Bhosari Accident News : डंपरखाली सापडून महिलेचा मृत्यू; डंपर चालकाला अटक

हा अपघात 25 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथील टाटा शोरूमच्या समोर घडला.

एमपीसी न्यूज – मोपेड दुचाकीला डंपरने मागून धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली. त्यानंतर डंपर महिलेच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात 25 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथील टाटा शोरूमच्या समोर घडला. पोलिसांनी आरोपी डंपर चालकाला अटक केली आहे.

पल्लवी अरुण किरवे (वय 38, रा. गणपती माथा, वारजे माळवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पल्लवी यांचे पती अरुण रामचंद्र किरवे (वय 48) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी बिरूद दाजीराव साळुंके (वय 53, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास फिर्यादी अरुण आणि त्यांच्या पत्नी पल्लवी मोपेड दुचाकीवरून (एमएच 12 / एचआर 7142) भोसरीकडून कासारवाडीकडे जात होते. ते टाटा शोरूम समोर आले असता एका डंपरने (एमएच 14 / जीयु 5970) त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.

या धडकेत फिर्यादी अरुण आणि त्यांच्या पत्नी रस्त्यावर पडले. त्यानंतर पल्लवी यांच्या अंगावरून डंपर गेला. त्याखाली सापडून पल्लवी यांचा जागीच मृत्यू झाला.

तर अरुण यांच्या पायाला हाताला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी आरोपी डंपर चालकाला अटक केली आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.