Bhosari Crime News : ‘तुम्ही कारवाई करून दाखवाच’ म्हणत पोलिसाला धक्‍काबुक्‍की; एकास अटक

एमपीसी न्यूज – कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला ‘तुम्ही कारवाई करून दाखवाच’ अशी दमदाटी करून शिवीगाळ केली. तसेच पोलिसांना धक्‍काबुक्‍कीदेखील केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.

शैलेश कृष्णा पाटील (वय 36, रा. दिघीरोड, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक विलास भगवान माने यांनी रविवारी (दि. 11) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माने आणि त्यांचे सहकारी चोपडे हे इंद्रायणीनगर, भोसरी येथे कर्तव्यावर होते.

त्यावेळी तिथे आलेल्या आरोपीने आरडा ओरडा करीत ‘तुम्ही सोहेल शेख यांची पावती का करता, तुम्ही बनावट पावती पुस्तक छापून पैसे कमविण्याचा धंदा करीत आहात. तुम्ही कारवाई करून दाखवाच’, असे म्हणत पोलिसांना दमदाटी, शिवीगाळ आणि धक्‍काबुक्‍की केली. तसेच पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.

याबाबत पोलिसांनी आरोपीला अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.