Kasarwadi Crime News: दारू आणायला दुचाकी दिली नाही म्हणून तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

एमपीसी न्यूज – दारू आणण्यासाठी दुचाकी दिली नाही, या कारणावरून तीन जणांनी मिळून एका तरुणाला सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री पावणेअकरा वाजता कासारवाडी येथे घडली.

संदेश शशिकांत शिंदे (वय 25, रा. रामदास जवळकर चाळ, कासारवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी इऱ्या (वय 19, पूर्ण नाव माहिती नाही), बंटी गावडे (वय 20, पूर्ण नाव माहिती नाही), आरबाज शेख (वय 23, सर्व रा. कासारवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे आणि त्यांचा मित्र गणेश हे दोघेजण कासारवाडी येथील वरून हॉटेल समोरून जात होते. त्यावेळी आरोपी तिथे थांबले होते. आरोपींनी दारू घेऊन येण्यासाठी फिर्यादी यांना त्यांची दुचाकी मागितली. शिंदे यांनी दुचाकी दिली नाही, या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना सिमेंटच्या गट्टूने मारले.

यात गणेश यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. तर शिंदे यांचा मित्र गणेश याला हाताने मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.