Bhosari Crime News: इंटरनेटवर बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवून तरुणीची सव्वातीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – इंटरनेटवर बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवून बँकेच्या पेजवर स्वतःचा नंबर ठेवला. त्यावर एका तरुणीने संपर्क केला असता तरुणाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन त्याद्वारे तरुणीच्या खात्यातून तीन लाख 29 हजार 509 रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना 21 जुलै 2021 रोजी रात्री संत तुकाराम नगर, भोसरी येथे घडली.

कोमल वसंतराव आखाडे (वय 26, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 16) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 09348375531 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोबाईल क्रमांक 09348375531 धारक एचडीएफसी बँकेचा प्रतिनिधी नसताना त्याने त्याचा मोबाईल क्रमांक एचडीएफसी बँकेच्या गुगल पेजवर ठेऊन तो बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवले.

फिर्यादी तरुणीने काही कामानिमित्त बँकेच्या गूगल पेजवरील आरोपीच्या क्रमांकावर फोन केला. त्यावेळी आरोपीने तरुणीच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्याआधारे तरुणीच्या खात्यातून तीन लाख 29 हजार 509 रुपये काढून घेत फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.