Bhosari Crime News : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून कामात अडथळा आणल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महावितरणचे कर्मचारी त्यांचे काम करत असताना त्यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला, याबाबत एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 9) सायंकाळी साडेसहा वाजता धावडे वस्ती, भोसरी येथे घडली.

स्वप्नील जाधव (वय 30, रा. कोंडीबा लांडगे मार्ग, धावडे वस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत महावितरणचे गणपत वसंत केवाळे (वय 50, रा.आदर्शनगर, दिघी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महावितरणमध्ये कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे सहकारी धावडे वस्ती, भोसरी येथील कोंडीबा लांडगे मार्गावर महावितरणचे काम करत होते. त्यावेळी आरोपी स्वप्नील जाधव तिथे आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.