Bhosari Crime News : गॅस कटरने एटीएम फोडून 23 लाखांची रोकड लंपास

0

एमपीसी न्यूज – भोसरी परिसरातील पांजरपोळ येथील एसबीआयचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने फोडले आहे. हा प्रकार आज (गुरुवारी, दि. 10) सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी एटीएम मधून 22 लाख 95 हजार 600 रुपये रोख रक्कम चोरून नेली.

अरविंद विद्याधर भिडे (वय 58, रा. सहकार नगर, पुणे) यांनी याबाबत गुरुवारी  (दि. 10) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांजरपोळ येथे पुणे-नाशिक महामार्गावर स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)चे एटीएम आहे. बुधवारी (दि. 9) रात्री साडेदहा ते गुरुवारी (दि. 10) सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर मशीनमधून पैशांच्या चार कॅसेट चोरट्यांनी चोरून नेल्या. यामध्ये 22 लाख 95 हजार 600 रुपये रोख रक्कम होती. तसेच चोरट्यांनी 30 हजार रुपयांचे एटीएमचे नुकसान केले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

एटीएम फोडल्याचा हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम तसेच अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलीस उपनिरीक्षक पूजा कदम तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment