Bhosari Crime News : पैशांसाठी उपाशी ठेवून विवाहितेचा छळ; सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी करत उपाशी ठेवून विवाहितेचा छळ केल्याची घटना चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली. याबाबत सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती बालाजी गोरख पांचाळ (वय 30), सासरे गोरख लक्ष्‍मण पांचाळ (वय 60), सासु सत्यभामा गोरख पांचाळ (वय 50), दीर गणेश गोरख पांचाळ (वय 35, सर्व रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत पीडित विवाहितेने मंगळवारी (दि. 11) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च 2019 ते 11 मे 2021 या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी विवाहितेकडे तिच्या आई वडिलांकडून एक लाख रुपये घर खर्चासाठी आणण्याची मागणी केली. ते पैसे न दिल्याच्या रागातून सासरच्या लोकांनी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली. विवाहितेला उपाशी ठेवून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.