Bhosari Crime : सकाळच्या वेळी घरातून दीड लाखाचे दागिने अन 15 हजारांची रोकड चोरीला

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी घराच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून घरातून एक लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 15 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 22) सकाळी सात ते आठ वाजताच्या कालावधीत महाराष्ट्र चौक, आळंदी रोड, भोसरी येथे घडला.

आशपाक सैद मन्सुरी (वय 39, रा. महाराष्ट्र चौक, आळंदी रोड, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मन्सुरी यांच्या घराच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी सकाळच्या वेळी घरात प्रवेश केला. घरातून 45.640 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 15 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण एक लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.