Bhosari Crime : पादचारी व्यक्तीला धारदार शस्त्राने मारहाण

एमपीसी न्यूज – पादचारी व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी शिवीगाळ करत धारदार शस्त्राने मारहाण केली. यामध्ये पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना 26 सप्टेंबर रात्री नऊ वाजता मेगामार्ट दापोडी येथे घडली.

अनिल महादेव नीरर्वाने (वय 33, रा. जनता वसाहत, पार्वती पायथा पुणे) यांनी 1 ऑक्टोबर रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 26 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता दापोडी येथील मेगामार्ट येथून पायी चालत जात होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना विनाकारण शिवीगाळ केली. तसेच धारदार शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.