Bhosari Crime: मित्रांसोबत दारु पिण्यासाठी रुम दे म्हणत चाळ मालकाला धमकी

एमपीसी न्यूज : मित्रांसोबत दारु पिण्यासाठी रुम दे म्हणत चाळमालकाला फोनवरून धमकी देण्यात आली असून त्यांच्या प्रिंटींग प्रेसची तोडफोडही करण्यात आली आहे. (Bhosari Crime) ही घटना फुगेवाडी येथे सोमवारी (दि.8) रात्री साडे आठ वाजता घडली आहे.

याप्रकरणी हेमंत लक्ष्मण फुगे (वय.44 रा. फुगेवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विशाल दिनकर (रा. फुगेवाडी) व त्याचे चार ते पाच साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उद्या प्रभात फेरीचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यांदी यांच्या चाळीचे फुगेवाडी येथे बांधकाम सुरु आहे. फिर्यादी यांना फोन करुन तेथे मित्रांसोबत पार्टी व दारू पिण्यासाठी एक रुम देण्याची मागणी आरोपीने फिर्यादी यांच्याकडे केली. तसेच रुम दिली नाही तर मारुन टाकण्याची धमकी देत शिवीगाळ केली. (Bhosari News) फिर्यादी यांच्या मालकीचे फुगेवाडी येथे प्रीटींग प्रेसचे दुकान आहे. तेथे साथीदारांसह जात प्रिंटीग चालकास शिवीगाळ करत प्रेस फोडून टाकीन अशी धमकी देत फिर्यादी यांची तेथे पार्क केलेल्या दुचाकीची तोडफोड केली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.