Bhosari Crime : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्यचार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

घनःश्याम भास्कर आडे (वय 19, रा. माहुली, ता मानोरा, जि. वाशीम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार जानेवारी ते एप्रिल 2020 या कालावधीत गव्हाणेवस्ती, भोसरी येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीसोबत आरोपीने जवळीक साधली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार लैंगिक अत्याचार केला. याबाबत मुलीने कुणाला काही सांगू नये, नाहीतरी मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. त्यानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.