Bhosari Crime : गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा मोबईल फोन तृतीयपंथीयाने पळवला

एमपीसी न्यूज – मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबलेल्या एका महिलेचा मोबईल फोन तृतीयपंथी व्यक्तीने जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 29) दुपारी साडेपाच वाजता इंद्रायणीनगर भोसरी येथे घडला.
दर्शना संजय महाजन (वय 35, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका तृतीयपंथी इसमावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दर्शना इंद्रायणीनगर येथील युनियन बँकेसमोर त्यांच्या मैत्रिणीसोबत बोलत थांबल्या होत्या. त्यावेळी एक 25 ते 30 वयाचा तृतीयपंथी इसम तिथे आला. त्याने दर्शना यांच्या हातातून पाच हजारांचा मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून पळून गेला.

फिर्यादी यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो इसम एका मोपेड दुचाकीवर बसून पळून गेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.