Bhosari Crime : अंत्यविधीसाठी गावी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी

0

एमपीसी न्यूज – अंत्यविधीसाठी गावी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी झाली. ही घटना गव्हाणे वस्ती, भोसरी येथे बुधवारी (दि. 18) पहाटे उघडकीस आली.

संजय जनार्दन गवळी (वय 59, रा. रामनगरी हौसिंग कॉम्प्लेक्‍स, गव्हाणेवस्ती, भोसरी) यांनी याबाबत बुधवारी (दि. 19) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय गवळी यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यासाठी फिर्यादी यांच्या घरातील सर्वजण 15 नोव्हेंबर रोजी आपल्या मूळगावी इंदापूर तालुक्‍यातील भिगवण जवळील डिकसर या गावी गेले. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून आतील तीन हजार 100 रुपयांचे चांदीचे दागिने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III