Bhosari Crime : उघड्या दरवाजावाटे 60 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून 60 हजारांचा मोबईल फोन आणि लॅपटॉप चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 29) सकाळी पावणे सात ते सव्वा सात वाजताच्या कालावधीत जामा मस्जिद जवळ दापोडी येथे घडली.

मनोज रघुनाथ पवार (वय 34, रा. जामा मस्जिद जवळ दापोडी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 29) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार यांच्या घरात गुरुवारी सकाळी पावणे सात ते सव्वा सात या कालावधीत अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजा वाटे प्रवेश केला. घरातून एक मोबईल फोन आणि लॅपटॉप असा 60 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.