Bhosari Crime : पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – भावासोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला वीट आणि दगडाने बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 24) दिघी रोड, भोसरी येथे घडली.

अजय विनायक माने (वय 27, रा. दिघी रोड, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत रविवारी (दि. 25) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभिषेक उर्फ बच्चा युवराज कांबळे (वय 20, रा. मोरया कॉलनी, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक याचे फिर्यादी अजय यांच्या भावासोबत भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग अभिषेक याच्या मनात होता. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता अजय दिघी रोड येथील विदर्भ मित्र मंडळाच्या समोरून घरी जात होता. त्यावेळी अभिषेक याने अजय यांना अडवले. अजय यांच्या भावाला फोन करायचा असल्याचे म्हणत अभिषेक याने अजय यांच्यासोबत भांडण केले. अजय यांना शिवीगाळ करत रस्त्यावर पडलेल्या वीट आणि दगडांनी मारहाण करून जखमी केले. तसेच पोलिसात तक्रार केल्यास बघून घेईन अशी धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.