Bhosari crime News : पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

केके उर्फ खंडू अशोक कालेकर (वय 22, रा. पवनानगर, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश सावंत यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहासमोर एक तरुण थांबला असून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपी कालेकर याला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पिस्तुल वापरण्याचा कोणताही परवाना कालेकर याच्याकडे नसल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.