Bhosari Crime : गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक; 9 लाख 37 हजारांचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 37 किलो 500 ग्राम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 10) सकाळी पावणे बारा वाजता लांडगे वस्ती येथे करण्यात आली आहे.

दत्ता पुरुषोत्तम कल्याणी (वय 25, रा. लांडेवाडी, भोसरी. मूळ रा. औराद शहाजनी, ता. निलंगा, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई नितीन खेसे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी अवैध धंद्यांविरोधात मोहिम उघडली आहे. अवैध धंद्यांना आळा बसावा म्हणून गुन्हे शाखेचे कर्मचारी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी नितीन खेसे यांना शिवशक्‍ती कॉलनी, भोसरी येथे एकजण झाडाच्या कडेला एकजण दोन पोत्यांसह संशयितरित्या उभा असलेला दिसून आला.

यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांच्याकडील दोन पोत्यांमध्ये 37 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा असल्याचे दिसून आले. या गांजांची किंमत नऊ लाख 37 हजार 710 रुपये इतकी आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याने हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याची कबुली पोलिसांना दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश, उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्‍त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक उपनिरीक्षक रवींद्र गावंडे, कर्मचारी आनंद बनसोडे, अमित गायकवाड, मनोजकुमार कमले, मारूती जायभाये, अंजनराव सोडगिर, नितीन खेसे, गणेश सावंत, विशाल भोईर तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहायक उपनिरीक्षक राजन महाडिक, राजेंद्र बांबळे, अजित कुटे आणि प्रसाद कलाटे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.