Bhosari : ग्राहक सुरक्षा प्रथम! भांबुर्डेकर ज्वेलर्सने ग्रहकांसाठी केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे होतंय सर्वत्र कौतुक

Bhosari: Customer safety first! The safety arrangements made by Bhamburdekar Jewelers for the customers are appreciated everywhere कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग वाढत असताना ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत भांबुर्डेकर ज्वेलर्सने कौतुकास्पद उपाययोजना केली आहे. फिजिकल डिस्टंसिन्गची काळजी घेत ग्राहक आणि सेल्समन यांच्यात जास्त संपर्क येणार नाही यासाठी दुकानात पारदर्शक काच लावण्यात आली आहे. ग्राहक सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या भांबुर्डेकर ज्वेलर्सचे सर्व ठिकाणी कौतुक होत आहे. 

सर्व जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने सराफ आणि ज्वेलर्स दुकाने खुली करण्याची सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नागरिक दुकानात जाण्यास टाळाटाळ करत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भोसरीतील भांबुर्डेकर ज्वेलर्सने उत्कृष्ठ उपाययोजना केली आहे. ग्राहक दुकानात प्रवेश करण्यापूर्वी त्याला हात साफ करण्यासाठी सॅनिटीजर दिले जाते. ग्राहकाने दुकानात प्रवेश केल्यानंतर त्यांना जे दागिने हवे ते पाहण्यासाठी सूट दिली जाते.

काउंन्टरवर ग्राहक आणि सेल्समन यांच्यात जास्त संपर्क येणार नाही यासाठी भांबुर्डेकर ज्वेलर्सकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. यासाठी पारदर्शक काच लावण्यात आली असून ग्राहक आणि सेल्समन यांचा थेट संपर्क येत नाही तसेच ग्राहकांना आवश्यक ते दागिने खरेदी करता येतात. पारदर्शक काच असल्यामुळे ग्राहकांना विविध प्रकारचे दागिने दाखवन्यास सुलभ होते. सोने खरेदी साठी मिळणाऱ्या सुरक्षित अनुभवाबद्दल अनेक ग्राहक समाधान व्यक्त करत आहेत.

दुकानात फिजिकल डिस्टंसिन्गची योग्य ती काळजी घेतली जाते. ग्राहकांना दुकानात मिळणाऱ्या सुरक्षेच्या सुविधा आणि पाहायला मिळणाऱ्या दागिन्यांची विविधता यामुळे सोने खरेदीसाठी ‘भांबुर्डेकर ज्वेलर्स’ नागरिकांचे पसंतीचे ठिकाण झाले आहे.

संपर्कासाठी पत्ता –

भांबुर्डेकर सराफ आणि ज्वेलर्स,
पीसीएमटी बस थांबा शेजारी,
लांडेवाडी रोड, भोसरी, पुणे 411039
संपर्क क्रमांक- 8446100411

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.