Bhosari Dahihandi : भोसरीसह समाविष्ट गावांमध्ये दहीहंडी उत्साहात

एमपीसी न्यूज – कोविड काळात दोन वर्षे दहीहंडी (Bhosari Dahihandi) उत्सव सार्वजनिकपणे साजरा करता आला नाही. मात्र, यावर्षी भोसरीसह समाविष्ट गावांत दहीहंडी उत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी सर्वच दहीहंडी उत्सवांना उपस्थिती दर्शवली. सेलिब्रेटी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

दहीहंडी उत्सवानिमित्त भोसरी आणि परिसरातील मंडळांचा लौकीक आहे. भैरवनाथ कबड्डी संघाने भोसरी पी.एम.टी चौकात मानाची दहीहंडी उभारण्यात आली. यावर्षी अपंगत्व किंवा अपघातात शरीराचा भाग गमावलेल्या नागरिकांसाठी कृत्रिम अवयव देण्यात आले. या दहीहंडी उत्सवासाठी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम’ अभिनेत्री प्राजक्ता माळी, सेलिब्रेटी अँकर दिप्ती हालवाई यांचे प्रमुख आकर्षण होते. युवा नेते योगेश लांडगे आणि सहकाऱ्यांनी नियोजन केले होते. अष्टविनायक मंडळ, चाकण गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. मुंबई, पुणे, बारामती आदी भागातील गोविंदा पथके उत्सवात सहभागी झाले.

चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या पुढाकाराने आणि शिवरक्त प्रतिष्ठानतर्फे घरकूल येथील मेन सर्कल येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख आकर्षक ‘बीग बॉस’ व ‘माझ्या नवऱ्याची बायको फेम ’मीरा जगन्नाथ हीने उपस्थिती दर्शवली. चेंबूर- मुंबई येथील रिद्धी-सिद्धी गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. त्यांना 5 लाख 55 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

भाजपा महिला मोर्चाच्या शहर उपाध्यक्षा सोनम जांभूळकर – जाधव यांच्या पुढाकाराने वुड्सव्हिले फेज-2, चिखली येथे उत्सव आयोजित केला आहे. यावेळी प्रमुख आकर्षण म्हणून सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अक्षया देवधर उपस्थित राहणार आहेत.

माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे आणि नागेश्वर महाराज दहीहंडी महोत्सवचे अध्यक्ष गणेश सस्ते यांच्या पुढाकाराने मोशी येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सव झाला. जय गणेश युवा फाउंडेशनतर्फे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘हाउसफूल-2’ फेम शाझहान पदमसी, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाड, ‘मन उडू उडू झालं’ फेम रीना मधुकर, ‘मुरंबा’ फेम आरुष बाणखेले यांनी बाळ-गोपाळ आणि प्रेक्षकांचा उत्साह वाढवला. जित्राई माता मित्र मंडळ, चाकण गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला.

दिघी गावठाण येथे डोळस मैदानावर माजी नगरसेवक विकास डोळस, संजय गायकवाड आणि कुलदीप परांडे यांच्या पुढाकाराने अखिल दिघीगाव दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी अमृता गोसावी आणि ‘धर्मवीर’आणि ‘मुळशी पॅटर्न’फेम क्षितीज दाते यांची प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित होती.

चाकण येथील माऊली गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. जाधववाडी – चिखली येथील रामायण मैदानावर संतोषतात्या जाधव युवा मंचतर्फे आणि माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या पुढाकाराने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ‘खुलता कळी खुलेना’फेम ओमप्रकाश शिंदे, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम अश्विनी महांगडे, सिने अभिनेते भगवान पाचोरे, ‘सुख म्हणजे नक्की काय असते’फेम माधवी निमकर, रिल्स स्टार पै. अभि गायकवाड यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

शहरातील पहिली महिला सार्वजनिक दहीहंडी…Bhosari Dahihandi

पिंपरी-चिंचवड शहरातील पहिली महिला सार्वजनिक दहीहंडी उत्सव श्री. वसंतनाना लोंढे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आली. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे या उत्सवाच्या प्रमुख आकर्षण होत्या. 5 लाख 55 हजार 555 रुपयांचे पारितोषिक असलेल्या या दहीहंडीचे संयोजन न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमातून क्रांतीनाना मळेकर यांनी केले. बाल शिवराज महिला गोविंदा पथक, मुंबई गोविंदा पथकाने ही मानाची दहीहंडी फोडली. रणरागिणी शिवकालीन युद्ध कला पथकाने गोविंदा आणि प्रेक्षकांचा उत्साह वाढवला.

छावा प्रतिष्ठानची दिमाखदार दहीहंडी…Bhosari Dahihandi

पिंपरी-चिंचवडमधील पहिली सार्वजनिक दहीहंडी भरवणाऱ्या छावा प्रतिष्ठानतर्फे यावर्षीसुद्धा दिमाखदार उत्सव साजरा केला. माजी नगरसेवक आणि छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर शिंदे यांनी या उत्सवाचे आयोजन केले. भगवान गव्हाणे चौक, पी.सी.एम.टी. चौक, भोसरी येथे झालेल्या या उत्सवाला मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. आमदार महेश लांडगे आणि जालिंदर शिंदे दोघांनीही डीजेच्या तालावर ठेका धरला. दादा आणि बापू एकत्र आल्यावर ‘जाळ अन् धूर एकत्रच निघतो’ अशी उस्फुर्त भावना यावेळी आमदार लांडगे यांनी व्यक्त केली. तसेच, भोसरी आणि ‘आपले लाडके आमदार’असा  उल्लेख करीत जालिंदर शिंदे यांनी त्याला दाद दिली. ‘केजीएफ’ फेम अभिनेता गुरूडा, ‘कारभारी लयभारी’फेम अनुष्का सरकाटे, निखील चव्हाण, ‘शॉर्टकट’फेम संस्कृती बालगुडे, ‘गडबड गोंधळ’फेम स्मिता गोंदकर आणि ‘टाईमपास-3’ फेम कृतीका गायकवाड उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.