Bhosari: माध्यमिक शाळेची धोकादायक इमारत पाडणार; राड्यारोड्यातून पालिकेला मिळणार सव्वासहा लाख रुपये

Bhosari: Dangerous condition secondary school building to be demolished; The pcmc will get Rs 6.25 lakhs या विद्यालयाची इमारत दोन मजली असून या ठिकाणी पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेची भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची इमारत धोकादायक झाली असल्याने ती पाडण्यात येणार आहे. त्यामधून निर्माण होणारा राडारोडा, स्टील, दरवाजे, खिडक्या, वीटा, फरशी, लोखंडी ग्रील, रेलींग, वायरींग आदी साहित्य इमारत पाडणा-या ठेकेदाराला देण्यात येणार आहे. त्यापोटी महापालिकेला सव्वासहा लाख रूपये मिळणार आहेत.

महापालिकेचे भोसरी येथे छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयाची इमारत दोन मजली असून या ठिकाणी पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.

मात्र, या विद्यालयाची इमारत सध्या धोकादायक झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने विद्यालयाची इमारत पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

_MPC_DIR_MPU_II

इमारत पाडल्यानंतर त्यातून निघणारा राडारोडा, स्टील, दरवाजे, खिडक्या, वीटा, फरशी, लोखंडी ग्रील, रेलींग, पत्रे, लाकुड, काँक्रीट, विद्युत वायरींग, विद्युत बटणे तसेच इतर काढता न येणारे साहित्य इमारत पाडणा-या ठेकेदाराला देण्यात येणार आहे. याचा मोबदला म्हणून ठेकेदाराकडून जास्तीत जास्त रक्कम घेण्यात येणार आहे.

त्यासाठी महापालिकेमार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार, समीर एंटरप्रायजेस आणि श्री गणेश कन्स्ट्रक्शन या दोन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. समीर एंटरप्रायजेस यांनी 6 लाख 34 हजार रूपये दर सादर केला.

तर, श्री गणेश कन्स्ट्रक्शन यांनी 2 लाख 52 हजार रूपये दर सादर केला. समीर एंटरप्रायजेस यांनी 6 लाख 34 हजार रूपये दर सादर केल्याने त्यांची निविदा मंजूर करण्यात आली. या विषयास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.