Bhosari : हॉटेलसमोरून भरदिवसा दुचाकी पळवली; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हॉटेलसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेली. हा प्रकार 31 जानेवारी रोजी सकाळी सव्वानऊ ते साडेसहा या कालावधीत घडली.

निलेश सुरेश खैरनार (वय 31, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खैरनार यांनी त्याची 20 हजार रुपये किमतीची एम एच 15 / डी डी 9925 दुचाकी नाशिक फाटा कासारवाडी येथील मराठा खानावळ हॉटेलसमोर सकाळी सव्वानऊ वाजता पार्क केली.

दिवसभरात अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सायंकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.