Bhosari : बालाजीनगर पीएमपीएमएल बस स्टॉपवर सापडले मृत अर्भक

एमपीसी न्यूज – बालाजीनगर येथील पीएमपीएमएल बस स्टॉपवर अज्ञात महिलेने अर्भक प्लास्टिक पिशवीत गुंडाळून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या अर्भकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) रात्री आठ वाजता उघडकीस आली.

महेंद्र लक्ष्मण सरवदे (वय 32, रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी यांना बालाजीनगर येथील पीएमपीएमएल बस स्टॉपवर एका प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये गुंडाळलेले अर्भक मिळून आले. आरोपींनी त्या अर्भकाचा मृत्यू झाल्याने कुणालाही माहिती न देता जाणीवपूर्वक त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला प्लास्टिक पिशवीत गुंडाळून टाकले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.