Bhosari : धावडेवस्ती येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

एमपीसी न्यूज – धावडेवस्ती भोसरी येथे एका घरात महिलेचा मृतदेह आढळला. मंगळवारी (दि. 19) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. भोसरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

सानिका देसाई (वय 23, रा. धावडेवस्ती, मूळ रा. अक्क्लकोट, जि. सोलापूर) असे मृतदेह आढळलेल्या विवाहितेचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून सध्या ते भोसरी येथील धावडेवस्ती येथे राहतात. योगेश हा कामानिमित्त घराबाहेर गेला होता. तो घरी परतला तेव्हा त्याची पत्नी बेशुद्धावस्थेत घरात पडल्याचे दिसून आले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी सानिका यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सानिका ज्या ठिकाणी बेशुद्धावस्थेत होत्या. तेथे जेवणाची भांडी आणि एक वायर आढळून आली आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर समजणार आहे. सध्या याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.