_MPC_DIR_MPU_III

Bhosari : संतनगर मित्र मंडळ, भूगोल फाऊंडेशन व इंद्रायणी सेवा संघाच्या दीपोत्सवात उजळले 5 हजार दिवे

एमपीसी न्यूज- संतनगर मित्र मंडळ, भूगोल फाऊंडेशन आणि इंद्रायणी सेवा संघ मोशी प्राधिकरण व परिसरातील इतर संस्थांच्या सहभागातून भोसरी एमआयडीसी जवळील डिस्ट्रिक्ट सेंटर सर्कल येथे मंगळवारी (दि. 12) त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त एक दिप पर्यावरणासाठी असा पर्यावरण पूरक दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी 5 हजारहुन अधिक दिवे प्रज्ज्वलित करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_IV

यावेळी उपस्थित महिलांनी झाडांच्या भोवती आकर्षक रांगोळी काढली. नगरसेवक संजय वाबळे, विक्रांत लांडे, ह.भ.प.श्री सुभाष महाराज गेठे (वेदांताचार्य), प्रा. शिवलिंग ढवळेश्वर, सचिन लांडगे, निलेश मुटके, प्रा.दिंगबर ढोकले, डॉ.नारायण हुले, भगवान पठारे, प्रा. मासाळ सर, आरोग्याधिकारी प्रभाकर तावरे लायन्स क्लबच्या शोभा फटांगरे, उज्वला शेकोकर, मंदा मानकर व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सर्वच परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या वेळी मान्यवरांनी दीपोत्सव व पर्यावरण जागृतीविषयी मार्गदर्शन केले.

_MPC_DIR_MPU_II

कार्यक्रमाचे संयोजन संतनगर मित्र मंडळ व भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत लांडगे, अनिल जगताप, बाबुलाल चै्ाधरी, भास्कर दातीर, साहेबराव गावडे, शशिकांत वाडते, राजेश किबिले,विठ्ठल वीर, विश्वनाथ टेमगिरे व इतर सहकाऱ्यांनी केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.