-MPC-TOP-MOST-BANNER-I

Bhosari : त्रिपुरारी पॊर्णिमेनिमित्त 5555 दिव्यांनी उजळला मोशी सर्कल परिसर

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संतनगर मित्र मंडळ, इंद्रायणी सेवा संघ, भूगोल फाउंडेशन यांच्या वतीने मोशी सर्कल, स्पाईन रस्ता भोसरी येथे एक दीप पर्यावरणासाठी या संकल्पनेखाली भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी लावण्यात आलेल्या 5555 दिव्यांनी परिसर उजळून गेला होता.

यावेळी माजी आमदार विलास लांडे, लायन्स क्लब भोजपुरी गोल्डचे अध्यक्ष सुदाम भोरे, उद्योजक अरुण इंगळे, एमपीसी न्यूजचे अनिल कातळे, कार्यक्रमाचे आयोजक विठ्ठल (नाना) वाळुंज पाटील तसेच संतनगर मित्र मंडळ, इंद्रायणी सेवा संघ, भूगोल फाउंडेशन, महाराष्ट्र साहित्य परिषद, संतनगर ज्येष्ठ नागरिक संघ, संतनगर महिला मंडळचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पर्यावरण मित्र, सायकल मित्र, वृक्षमित्र, निसर्ग मित्र, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी लावण्यात आलेल्या ५ हजार दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला होता. आरोग्याची पर्यावरणाची ज्योत कायम तेवत रहावी. या ज्योतीने आपणही उजळा आणि इतरांनाही उजळवा अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. पांडुरंग वाळुंज यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर निवड झाल्याबद्दल झाडाचे रोप देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.