Bhosari : भोसरी मतदारसंघात विकासकामांचा धडाका; मोशी, कुदळवाडीत विविध कामांना सुरुवात

आमदार महेश लांडगे यांच्या विकासनिधीतून विकासकामे

एमपीसी न्यूज – भोसरी मतदारसंघात विकासकामाचा धडाका सुरु आहे. आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून विकासकामे केली जात आहेत. कुदळवाडी, मोशी प्राधिकरणात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, पाईपलाईनचे काम आज (गुरुवारी) सुरु करण्यात आले आहे. कार्तिक लांडगे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.

‘फ’ प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव, निखील काळकुटे, नितीन बो-हाडे, निखील बो-हाडे, निलेश नेवाळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोशी प्राधिकरणातील नागरिकांची फुटपाथवर, सोसायटी परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवून देण्याची मागणी होती. आमदार महेश लांडगे यांच्याकडे गृहनिर्माण सोसायटीतील नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार आमदार लांडगे यांच्या आमदार निधीतून कामांना सुरुवात करण्यात आली आहे.

मोशी प्राधिकरणातील गॅलेक्सी अव्हेनिव्ह सोसायटी सेक्टर क्रमांक नऊ मध्ये फुटपाथवर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, सिद्धराज सोसायटी सेक्टर क्रमांक 13 समोरील रोडच्या डांबरीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कुदळवाडी ते चिखली देहू-आळंदी रोड पिण्याच्या पाईपालईनच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

हे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेऊन हे काम सुरु केले आहे. याशिवाय कुदळवाडीतील अंतर्गत रस्त्यांच्या कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.