Bhosari : महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण वर्ग

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाअंतर्गत नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या वतीने खास महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यामध्ये महिलांसाठीचे कायदे, शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

भोसरीतील, गवळीनगर येथे झालेल्या या साक्षरता वर्गात 135 महिला सहभागी झाल्या. या महिलांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यावेळी भाजपच्या महिला शहराध्यक्षा शैला मोळक, नगरसेविका प्रियंका बारसे, सारथी गाईड फाउंडेशनच्या अध्यक्षा अॅड. कविता स्वामी, महिला आयोगाच्या डिजिटल साक्षरता प्रमुख अर्चना दहिवाल उपस्थित होत्या.

अर्चना दहिवाल यांनी महिलांना मार्गदर्शन केले. महिलांसाठीचे कायदे, महिलांसाठी असलेल्या शासकीय योजना, तेजस्विनी, भीम व उमंग अँप तसेच सॉफ्टवेअर बद्दल महिलांना माहिती दिली. ऑनलाईन बँकींगद्वारे मिळकत कर, लाईटबिल कसे भरू शकतो. तसेच मनी ट्रान्सफर ई-मेल पाठवणे, वाचण्याबाबत महिलांना साक्षर करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.