Bhosari : गाडी लावण्यावरून वाद; परस्परविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गाडी लावण्यावरून एकाने तरुणाच्या थोबाडीत मारली. ही भांडणे वाढल्याने वाद झाला. ही घटना शनिवारी (दि. 24) सायंकाळी सावरकर चौक दापोडी येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबासाहेब वसंत चौगुले (वय 35, रा. सावरकर चौक, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रवी बाईत, प्रथमेश बाईत (दोघे रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

बाबासाहेब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी प्रथमेश हा फिर्यादी बाबासाहेब यांच्या घरासमोर मित्रांसोबत थांबला होता. तो मोठमोठ्याने शिवीगाळ करीत होता. यामुळे बाबासाहेब यांनी प्रथमेश याला समजावले. या रागातून प्रथमेश आणि रवी या दोघांनी मिळून बाबासाहेब यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये बाबासाहेब यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.

याच्या परस्पर विरोधात माधवी रवींद्र बाईत (वय 40) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बाबासाहेब वसंत चौगुले आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माधवी यांचा मुलगा प्रथमेश आणि बाबासाहेब या दोघांमध्ये गाडी लावण्यावरून वाद झाला. यामध्ये बाबासाहेब याने प्रथमेशच्या थोबाडीत मारली. ही भांडणे सोडवण्यासाठी माधवी यांचे पती रवींद्र गेले असता आरोपींनी त्यांना आणि माधवी यांना मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like