Bhosari : घटस्फोटीत पत्नीवर डॉक्टर पतीचा बलात्कार; पतीच्या भावाकडून लैंगिक छळ
Divorced wife raped by doctor husband; harassment from husband's brother

एमपीसी न्यूज – कायदेशीर घटस्फोट झालेल्या पत्नीवर डॅाक्टर पतीने बलात्कार केला. तसेच त्याच्या भावाने पीडित महिलेचा लैगिंक छळ केला व शरीर सुखाची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथे 2018 ते 2020 दरम्यान घडली.
याप्रकरणी 36 वर्षीय पीडित महिलेने शुक्रवारी (दि.17) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी डॉक्टर पती आणि त्याच्या भावासह सासरच्या पाच जणांवर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी डॉक्टर पती यांचा कायदेशीर घटस्फोट झाला आहे. तरीही डॉक्टर पतीने पीडित महिलेच्या घरात घुसून तिला शिवीगाळ करून तिच्यावर बलात्कार केला.
तसेच डॉक्टर पतीच्या भावाने पीडित महिलेशी अश्लील चाळे करत शरीर सुखाची मागणी केली.
आरोपीनी पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.