Bhosari : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेराहून दोन लाख घेऊन ये असा तगादा लावून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 14) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पती अमोल उत्तम त्रिभुवन, सासू शशिकला उत्तम त्रिभुवन, सासरा उत्तम मनोहर त्रिभुवन, दीर महादेव उत्तम त्रिभुवन (सर्व रा. संजय गांधीनगर, मोशी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित महिलेकडे माहेराहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच महिलेस जीवे मारण्याची धमकी देत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. यावरून विवाहितेने सासरच्यांविरोधात गुन्हा नोंदवला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.