Bhosari: डॉ. मनीषा रंधवे यांचा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते सन्मान

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आणि प्रा. प्रकाश पगारिया व्याख्यानमाला अंतर्गत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या माजी महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते डॉ. मनीषा रंधवे यांना भूमिपुत्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भोसरीतील प्रीतम-प्रकाश महाविद्यालयात शुक्रवारी (दि.4) हा सोहळा पार पडला. यावेळी प्रकाश रोकडे, अशोक पगारिया, मधूश्री ओव्हाळ, मंदा रोकडे उपस्थित होते.

लक्ष्मण ढोबळे म्हणाले, ”साहित्याचा जागर, साहित्याची दिवाळी साजरी होत असताना, साहित्याची मांदियाळी होत असताना मराठी भाषेचे वैभव कसे वाढेल, हे मांडले गेले पाहिजे. साहित्यातून संस्कार घडतात. अंधार वाटा उजळाव्यात, संकटांवर मत करण्याची शक्ती मिळावी. साहित्यवृद्धीसाठी लेखक आणि वाचकांचा सूर लागला पाहिजे. आज औद्योगिकरणामुळे सर्वस्पर्शी साहित्य निर्माण करण्यासाठी बुद्धिवैभवाच्या क्षितिजावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्यघटना लेखन हे अधिक जवळचे वाटते”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.