Bhosari : अमली पदार्थ सेवन केलेल्या ट्रक चालकाची रिक्षाला धडक, रिक्षा चालक ठार

शुक्रवारी (दि.7) पुणे - नाशिक महामार्गावर भोसरी येथे हा अपघात घडला. ; Drug-hit truck driver hits rickshaw,Rickshaw driver killed

एमपीसी न्यूज – वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव जाणाऱ्या ट्रकने तीन चाकी रिक्षाला जोरात धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक रिक्षासह ट्रक खाली सापडला. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.7) पुणे – नाशिक महामार्गावर भोसरी येथे हा अपघात घडला.

शिवाजी बाजीराव दंडवते ( वय. 32) असे अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय राजेंद्र दंडवते ( वय. 24, रा. लांडेवस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी आरोपी ट्रक चालक प्रदीपसिंग विजयसिंग सोधा ( वय. 29, रा. कुकुम, ता. कच्छ, जि. भुज, गुजरात) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप सिंग हा अमली पदार्थांचे सेवन करून ट्रक ( जीजे 18 एझेड 3637) घेऊन नाशिक-पुणे महामार्गावरून पुण्याकडे निघाला होता.

त्यावेळी या ट्रकने महामार्गावरून जाणाऱ्या तीन चाकी ॲपे रिक्षाला ( एमएच 14 एएस 3979) जोरात धडक दिली.

या धडकेत रिक्षा ट्रकला अडकली व त्यातील रिक्षा चालक ट्रक खाली आला. ट्रक चालकाला रिक्षा चालक चाकाखाली आल्याचे माहिती असतानाही त्याने काहीही विचार न करता चाकाखाली आलेल्या रिक्षाचालकाच्या डोक्यावरून ट्रक चालवला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला.

ट्रकने पुढे मारूती वॅगनार ( एमएच 14 ईपी 2489) तसेच ऑटो रिक्षाला (एमएच 14 सीयु 3122) देखील धडक दिली. त्यात या वाहनांचे देखील नुकसान झाले. तर ऑटो रिक्षा चालक जखमी झाला.

भोसरी पोलीस अधिक तपात करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.