Bhosari : ‘डायनोमर्क’ कंपनीत दत्त जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – भोसरी येथील डायनोमर्क कंपनीत मागील दहा वर्षापासून दत्त जयंती साजरी करण्यात येते. दत्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दत्ताची विधिवत पूजा, होमहवन व अभिषेक कंपनीच्या संचालिका अमिता राऊत व व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत यांच्या हस्ते करण्यात आली. दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी उत्पादन बंद ठेवून कंपनीत मशिनरीची, भोवतालच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली, असे मनुष्यबळ विकासप्रमुख सूर्यकांत मुळे यांनी सांगितले आहे.

यावेळी जयश्री बोरसे व सहकारी महिलांनी दत्त मंदिरासमोर आकर्षक रांगोळी काढली. यावेळी कार्यक्रमासाठी राऊत, सूर्यकांत मुळे, गुणवंत कामगार श्रीकांत जोगदंड, विभागप्रमुख, प्रविण बाराथे, मोहन कृष्णन, हर्षल शेळके, अमोद राऊत, अक्षरा राऊत, हेमंत नेमाडे, दिलीप ईधाते, केतकी राऊत आदी उपस्थित होते.

कंपनीत दिवसभर ध्वनिवर्धकाद्वारे भक्ती गीते सादर केली गेली. आपल्या कंपनीतील प्रत्येक कामगाराला ही आपलीच कंपनी आहे, असे वाटावे म्हणून कामगारांच्या कुटुंबीयांना उत्पादनाची माहिती प्रत्यक्ष यंत्राजवळ जाऊन देण्यात आली. दत्त जयंतीनिमित्त सर्व कामगारांना आणि कुटुंबीयांना तसेच सप्लायरला, व्हेंडरला पण स्नेहभोजन भोजन देण्यात आले. यामुळे कंपनीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवी भेंनकी, बाळासाहेब शिंदे, एल्लापा पौगुडवाले, डॉमनिक स्वामी आदींनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.