_MPC_DIR_MPU_III

Bhosari : बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण; ‘इंद्रायणी थडी’ हा आमदार महेश लांडगे यांचा स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज – आजवर भोसरी विधानसभा मतदारसंघात महिला बचतगटांचा उपयोग केवळ निवडणुकांच्या तोंडावर मतांचा जोगवा मागण्यासाठी केला जात होता. मात्र, मतदारसंघातील माता-भगिनींसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे; याकरीता आमदार महेश लांडगे यांनी ‘शिवांजली सखी मंच’च्या पुढाकाराने ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे आयोजन केले. महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या व्यावसायिकतेला चालना देणारा हा एक स्तुत्य उपक्रम म्हणून संपूर्ण राज्यभर नावारूपास येत आहे.

_MPC_DIR_MPU_IV

महराष्ट्रभर नावलौकिक निर्माण झालेल्या जत्रेला चार दिवसांमध्ये सुमारे 5 लाख नागरिकांनी भेट दिली. तसेच, भोसरी मतदारसंघातील 580 महिला बचतगट तसेच वैयक्तिक महिलांनी या जत्रेत सहभाग दर्शवला. या जत्रेत सुमारे चाडेचार कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती.

_MPC_DIR_MPU_II

‘इंद्रायणी थडी’च्या माध्यमातून लहान मुलांसाठी बालजत्रा, महिलांसाठी भजन स्पर्धा, गावरान खाद्य महोत्सव, महिला आरोग्य शिबीर, फॅशन शो, डान्स स्पर्धा, महिला उद्योजकता मार्गदर्शन, होम मिनिस्टर कार्यक्रम, महिलांसाठी पारंपरिक खेळ, महिलांसाठी जॉब फेअर, योग व झुंबा ऐरोबिक्स प्रशिक्षण आदी उपक्रम राबवण्यात आले.

यावेळी शारदा लांडगे म्हणाल्या, पूजा लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ‘शिवांजली सखी मंच’च्या माध्यमातून इंद्रायणी थडी ही भव्य जत्रा भोसरीमध्ये भरवण्यात आली. महिला सक्षमीकरण आणि महिला रोजगार निर्मितीसाठी हा उपक्रम चालना देणारा ठरला. इंद्रायणी थडी मध्ये सुमारे ७०० महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. या बचत गटातील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. महिला बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी मोठी बाजारपेठ आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून महिलांना मिळाली.

शोभा गव्हाणे म्हणाल्या, भोसरी परिसरात अनेक बचत गट आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक स्तुत्य उपक्रम राबविले जातात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेळोवेळी प्रयत्न होतात. मात्र, समाजात त्यांचे कलागुण मांडण्याची संधी त्यांना फार कमी वेळेला मिळते. त्यांना ही संधी मिळावी. महिला बचत गटांनी समाजासमोर जाऊन त्यांचे कलागुण सादर करावेत. तसेच त्यातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार महेश लांडगे आणि शिवांजली सखी मंच यांच्या माध्यमातून इंद्रायणी थडी या जत्रेचे आयोजन करण्यात आले. तसेच वेळोवेळी महिला सक्षमीकरणासाठी आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. भोसरी आणि परिसरातील महिलांमध्ये त्यामुळे आत्मविश्वास निर्माण होत आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.