BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : लोकसभा निवडणूक ! भोसरीतील वखार मंडळाच्या गोदामात मतदारयंत्रांची तपासणी

0 251
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रांची तपासणी सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील मतदानयंत्रे (ईव्हीएम) भोसरीतील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवली असून त्याची तपासणी केली जात आहे. तपासणी झाल्यानंतर विधानसभा मतदारसंघांनुसार मतदानयंत्रांचे वितरण केले जाणार आहे.

.

पुणे लोकसभा मतदारसंघातील – शिवाजीनगर, कोथरूड, कॅटोन्मेंट, पर्वती, कसबा पेठ, वडगाव शेरी,
बारामती लोकसभा मतदारसंघातील – बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर, भोर-वेल्हे, खडकवासला
शिरूर लोकसभा मतदारसंघातील – शिरूर, खेड-आळंदी, भोसरी, आंबेगाव, जुन्नर, हडपसर
मावळ लोकसभा मतदारसंघातील – पिंपरी, चिंचवड आणि मावळ या विधानसभा मतदारसंघानुसार वितरित केली जाणारी मतदान यंत्रे वखार महामंडळाच्या भोसरीतील गोदामात ठेवली आहेत.

मतदान यंत्रे चांगल्या व चालू स्थितीत आहेत की नाहीत, त्याची तपासणी केली जाणार आहे. सुरक्षा साधने, व्हिडिओ चित्रीकरण कॅमे-यांची तपासणी केली जाईल. उमेदवारांची यादी असलेले यंत्र (बीयू अर्थात बॅलेट युनिट), मतदार केंद्रप्रमुखाकडील नियंत्रण यंत्र (सीयू अर्थात कंट्रोल युनिट) आणि मतदार सत्यता पडताळणी यंत्र (व्हीव्हीपॅट अर्थात वोटर व्हेरियबल पेपर ऑडिट ट्रायल) यांचीही तपासणी केली जात आहे. मतदानापूर्वी विधानसभा मतदारसंघानिहाय मतदानयंत्रे पाठविली जाणार आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: