Bhosari : एटीएम सेंटर विचारण्याच्या बहाण्याने भरदिवसा तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज – एजन्सीचे पैसे एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी आलेल्या तरुणाला एटीएम सेंटर विचारण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून लुटले. ही घटना शनिवारी (दि. 17) दुपारी साडेतीनच्या सुमारास लांडेवाडी भोसरी येथे घडली.

अमोल रमेश कस्तुरे (वय 25, रा. चिखली. मूळ रा. सोलापूर) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल एअरटेल कंपनीच्या शंकर एजन्सीमध्ये काम करतात. शनिवारी एजन्सीचे पैसे घेऊन ते लांडेवाडी येथील ऍक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये गेले असता दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून एसबीआयचे एटीएम सेंटर कुठे आहे, असे विचारले.

एसबीआय एटीएम सेंटर दाखवण्यासाठी अमोल पायी जात असताना दोघांनी अमोल यांच्याशी झटापट करून 39 हजार 500 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.