Bhosari : शॉर्ट सर्किटमुळे घराला आग

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रिक शॉर्ट-सर्किटमुळे एका घरामध्ये आग लागली. ही घटना भोसरी येथे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.
अग्निशामक विभागाने माहितीनुसार, प्रशांत चंद्रकांत चौरे यांनी सकाळी 7.10 वाजता अग्निशामक दलास याबाबत वर्दी दिली. त्यानुसार भोसरी अग्निशामक उपकेंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला.
मात्र, तोपर्यंत नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविले होते. या आगीत घरातील विद्युत उपकरणे जळून खाक झाली. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.