Bhosari : बंद कंपन्यांना आग; कागदपत्रांसह कंपन्या जळून खाक

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी मधील टी ब्लॉक येथे ट्रान्सपरंट एनर्जी सिस्टिम्स प्रा. ली. आणि भिडे अँड सन्स या कंपन्यांना आग लागली. आगीमध्ये कंपनीतील कागदपत्रे, संगणक आणि अन्य सर्व साहित्य जळून खाक झाले. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री आठच्या सुमारास घडली.

अग्निशमन विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठच्या सुमारास सुभाष गायकवाड नावाच्या व्यक्तीने भोसरी एमआयडीसी मधील टी ब्लॉकमधील दोन कंपन्यांना आग लागल्याची माहिती दिली. त्यानुसार पिंपरी अग्निशमन विभागाचे दोन, प्राधिकरण एक, भोसरी एक असे एकूण चार बंब घटनास्थळी दाखल झाले. तीन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. कंपनी बंद असल्यामुळे कंपनीतील कोणीही कर्मचारी अथवा अधिकारी यांची भेट झाली नाही. आग दुस-या मजल्यावर लागली असल्याने आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. कंपनीच्या वतीने माहिती देण्यासाठी घटनास्थळी कोणीही उपस्थित नसल्याने आर्थिक नुकसान किती झाले, याबाबत माहिती मिळू शकली नाही. लिडिंग फायरमन अशोक कानडे, दिलीप कांबळे, बाळासाहेब वैदय, सारंग मगळुरकर, विनायक नाळे, शंकर पाटील, मयुर कुंभार, बागडे अशा 20 जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.