Bhosari : सेंच्युरी एंका कंपनीत भीषण आग

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी मधील सेंच्युरी एंका कंपनीत आग लागली. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी मधील सेंच्युरी एंका कंपनीत आज सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच वल्लभनगर अग्निशमन विभागाचे दोन, भोसरी, प्राधिकरण, तळवडे अग्निशमन दलाचे प्रत्येकी एक, बजाज कंपनी आणि हिंजवडी एमआयडीसी अग्निशमन विभागाचे एकूण आठ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. काही प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. तसेच घटनेत जीवित अथवा वित्त हानीबाबतही माहिती मिळू शकली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.