Bhosari : पाच जणांची मध्यरात्री घरातू घुसून महिलेला मारहाण; भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज – मध्यरात्री पाच जणांनी मिळून महिलेच्या घरात घासून तिला मारहाण केली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी (दि. 10) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जयभीमनगर दापोडी येथे घडली.

सुरेखा सतीश परदेशी (वय 47, रा. जयभीम नगर, दापोडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार इशुदास ऊर्फ दास अश्रू गायकवाड (वय 42), सविता येशुदास गायकवाड (वय 35), रतन अश्रू गायकवाड (वय 47, सर्व रा. दापोडी) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा आणि येशुदास या दोघांमध्ये शुक्रवारी शाब्दिक वाद झाला. त्यावरून शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी महिलेच्या घराचा दरवाजावर लाथा मारून घरात प्रवेश केला. येशुदास याने सुरेखा यांना छोट्या हत्याराने मारले. दोन अल्पवयीन मुलांनी लाकडी बांबूने डोक्यात, कपाळावर, हातावर मारले. तर, सविता आणि रतन यांनी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

यामध्ये सुरेखा गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी येशुदास याला अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.