Bhosari : रिक्षा चालकाच्या दारू आणि पैशांची जबरी चोरी

एमपीसी न्यूज : – रिक्षा चालकाकडून बियर आणि पैसे जबरदस्तीने (Bhosari) नेल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 27) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास विशाल वाईन समोर भोसरी येथे घडली.

उमेश विष्णू भालेराव (वय 25, रा. भोसे, ता. खेड. मूळ रा. बीड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : भर दिवसा महिलेला अडवून लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल पवार (Bhosari) याने फिर्यादी उमेश यांच्याकडून विशाल वाइन भोसरी येथून बियर घेतली. त्यानंतर फिर्यादी यांच्या खिशात असलेले 9 हजार 600 रुपये अमोल पवार याने बळजबरीने घेतले. त्यानंतर पोलिसात तक्रार केल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देखील आरोपी अमोल याने फिर्यादी उमेश यांना दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share