Bhosari : डॉ अमोल कोल्हे यांच्या विजयाचे किंगमेकर ठरले माजी आमदार विलास लांडे

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांनी खासदार आढळराव-पाटील यांच्या विरोधात लढून विजयश्री खेचून आणली. या विजयश्रीमध्ये माजी मदार विलास लांडे यांचा महत्वाचा वाटा मानता येईल. उमेदवार म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव घोषित केल्यानंतर त्यांच्या विजयाची संपूर्ण जबाबदारी माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे राष्ट्रवादी पक्षाने सोपवली होती. ही जबाबदारी लांडे यांनी मोठ्या शक्तीनिशी घेत डॉ. कोल्हे यांना विजयी केले. त्यामुळे एका अर्थाने विलास लांडे हे डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी किंगमेकर ठरले आहेत.

विलास लांडे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत फ्लेक्सच्या माध्यमांतून मतदारसंघातील प्रश्नांना वाचा फोडली. भोसरी मतदारसंघामध्ये मागील निवडणुकीत ८७ हजाराचे मताधिक्य होते. संपूर्ण देशामध्ये यावेळी मोदीलाट असून सुध्दा डॉ. अमोल कोल्हे यांनी तीन टर्म खासदार असणा-यांना फक्त ३८ हजाराच्या लीडवर आणले. डॉ. अमोल कोल्हेंच्या प्रचाराचा नारळ भोसरीतून फोडण्यात आला. रॅली, पदयात्रा काढून कोल्हे यांच्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली. कोल्हे आणि लांडे यांची राजकारणाच्या पलीकडे मैत्रीसंबंध आहे. विजयासाठी भोसरीत लांडेंनी सहभाग घेतला. त्यामुळे डॉ. अमोल कोल्हें यांच्या विजयाचे सर्व श्रेय माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे जाते.

  • शिरुर मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या विरुध्द डॉ. अमोल कोल्हे ही लढत रंगतदार ठरली. माजी आमदार विलास लांडे यांनी रात्रीचा दिवस करुन प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन कोल्हे यांच्या विजयाची पताका शिरुरमध्ये रोवण्याचा निश्चय केला. आणि तो पूर्ण केला देखील.

शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुरचे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांना पराभूत करण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांच्यापुढे मोठे आव्हान होते. हे आव्हान कुठेही कमी पडू नये म्हणून माजी आमदार विलास लांडे यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक करुन माजी आमदार विलास लांडे यांच्याबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रचार करुन डॉ. अमोल कोल्हें यांना कमी वेळेत संपूर्ण मतदार संघात प्रचार केला. त्यामुळे डॉ. कोल्हे यांचा विजय साकार झाला.

  • माजी आमदार विलास लांडे यांनी ज्य़ेष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेला शब्द पाळला. पण मावळमधून पार्थ पवार विजयी झाले असते तर हा विजय द्विगुणित झाला असता हे निश्चित.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.